शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० हजार रु अनुदान.

गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० हजार पर्यंत अनुदान

नमस्कार मित्रांनो , जनावरांच्या गोठ्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते. परंतु यासाठी प्रस्ताव कसा सादर करायचा, कुठे सादर करायचा, या साठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहे, पात्रता काय असणार आहे याची बहुतांश शेतकऱ्यांना किवा पशुपालकांना माहीतीच नसते. तर या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आज या लेखातून पाहणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना/पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता यावा.

तर मित्रहो, या योजनेचे अर्ज किवा प्रस्ताव आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मध्ये द्यायचे आहे. हे अर्ज ऑफलाईन स्वरूपाचे आहेत.

योजनेची उद्दिष्टे.

गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे : जनावरांच्या गोठ्याची जागा हि ओबडधोबड व खच खड्ग्यांची भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध प्रकारचे आजार होत असतात. गाई म्हशीची कास निकामी होऊन त्यांना खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी याठिकाणी चारा व खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वताची जमीन व इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी यासठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार १८८ रु खर्च येईल. यासाठी ६ गुरांसाठीची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.

लागणारी कागदपत्रे : या योजने करिता आपल्याला आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक प्रस्ताव सादर करायचा आहे . सोबतच आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र, जमीन स्वताच्या नावे असल्याबाबतचे सर्व कागदपत्रे ,पशुधन उपलब्धता प्रमाणपत्र ,अल्प भूधारक प्रमाणपत्र , ग्रामपंचायत शिफारस पत्र , संमती पत्र , प्रस्तावित जागेचा GPS फोटो , उपलब्ध पशुधनाचा GPSमध्ये TAGGING फोटो , या अगोदर जनावारंचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्या बाबत प्रमाणपत्र . हि सर्व कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सादर करावीत.

1 thought on “शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० हजार रु अनुदान.”

Comments are closed.