Bandhkaam Kaamgar Nondani करा आणि मिळवा ३२ योजनांचा लाभ

Bandhkaam Kaamgar Nondani

Bandhkaam Kaamgar Nondani | बांधकाम क्षेत्रात कामगार हा प्रत्येक प्रकल्पाचा कणा असतो. बांधकाम कामगाराच्या भूमिकेचे महत्व आणि त्यांच्या कल्याणाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे.

रस्ते, पूल, रेल्वे, विमानतळ आणि इमारती यासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यात आणि त्याची देखरेख करण्यात बांधकाम कामगार महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या पायाभूत सुविधा वाहतूक दळणवळण वाणिज्य आणि सर्वागीण सामाजिक विकासासाठी आवश्यक आहेत.

Election Voter List 2024 | तुमचे नाव मतदार यादीत तपासा मोबाईल वर

Bandhkaam Kaamgar Nodani पात्रता :

 • अर्जदार हा १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार असावा.
 • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराने मागील १ वर्षात ९० दिवस किंंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.

कोणते कामगार अर्ज करू शकतात :

Bandhkaam Kaamgar Nondani | खालील कामावर काम करणारे कामगार बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात.

 • इमारत
 • रेल्वे
 • ड्रेनेज वर्कर
 • सिंचन कामगार
 • गटार व नळजोडणी कामगार
 • वातानुकुलीत यंत्रणा बसवणे व त्याची दुरुस्ती करणे
 • लिफ्ट व स्वयंचलित जिने बसवणे
 • सुतारकाम
 • काचाची कामे करणारे
 • वीट भट्टी कामगार
 • वायरलेस
 • रेडीओ
 • दूरध्वनी
 • रस्ते निर्मिती कामगार
 • टाईल्स किवा लादी बसवणी कामगार
 • दगड फोडणी कामगार

PM Shram Yogi Maandhan yojana : मिळणार ३००० रु पेंशन

Bandhkaam Kaamgar Nodani आवश्यक कागदपत्रे :

 • ९० दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र. ( ग्रामसेवक, ठेकेदार, contractor )
 • वयाचा पुरावा.
 • ओळखपत्र.
 • ३ पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • रहिवासी दाखला.
 • फॉर्म v भरून खालील कागदपत्रांसह मंडळात नोदणी करावी.

Bandhkaam Kaamgar Nondani साठी अर्ज कसा करावा :

 • सर्वप्रथम MAHABOCW.IN या Official वेबसाईट वर जायचे आहे.
 • वेबसाईट च्या होम पेज वर तुम्हाला कामगार पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • पुढे Worker Registration / कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
Bandhkaam Kaamgar Nondani. Bandhkaam Kaamgar registration.
 • तुमची जन्म दिनांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.
 • व Check Your Elegibility या पर्यायावर क्लिक करून तुमची पात्रता तपासून घ्या.
Bandhkaam Kaamgar Nondani तुमची पात्रता तपासा / check your elegibility
 • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून घ्या व ती अपलोड करा.
 • फॉर्म सबमिट करा. व त्याची प्रिंट काढा तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना :

१ ) सामाजिक सुरक्षा योजना :

२ ) शैक्षणिक योजना :

 • इयत्ता पहिली ते सातवी दरम्यान शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
 • इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत प्रती वर्ष ५००० रुपये शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात येणार आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असतील त्या विद्यार्थ्यांना १० वी ते १२ वी दरम्यान प्रत्येक वर्षी १०,००० रुपये मिळणार आहेत.
 • १२ वी नंतर बांधकाम कामगारांचा मुलगा/मुलगी जर Medical चे शिक्षण घेत असेल अश्या विद्यार्थ्यांना प्रती वर्ष एक लाख रुपये लाभ देण्यात येत आहे.
 • Engineering/अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रती वर्ष ६०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
 • या योजनेचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम कामगारांच्या पत्नीलाही जर शिक्षण घ्यायचे असेल तर ते या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यास MS-CIT कोर्स मध्ये शिष्यवृत्ती.
 • बांधकाम कामगाराच्या पाल्यांना IIT व तत्सम शिक्षण घेयास आर्थिक साहाय्य.
 • बांधकाम कामगाराच्या पाल्यांना TABLET व LAPTOP चे वाटप.

३ ) आरोग्य विषयक योजना :

 • नॉर्मल डिलीवरी साठी १५००० रुपये आर्थिक साहाय्य.
 • सिझेरियन डिलीवरी साठी २०००० रुपये आर्थिक साहाय्य.
 • कामगाराला एखाद्या अपघातामुळे अपंगत्व आल्यास ७५ टक्के किवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्यास २ लाखाची आर्थिक मदत.
 • बांधकाम कामगाराने जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर मुलीच्या नावे १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव.
 • बांधकाम कामगार जर हॉस्पिटल मध्ये ADMIT असेल तर जेवढा काळ कामगार ADMIT असेल त्या काळात पत्नीला आर्थिक साहाय्य केले जाईल.
 • बांधकाम कामगाराला महात्मा फुले जन आरोग्य योजेनेचा लाभ दिला जाईल.
 • बांधकाम कामगाराला व त्याच्या परिवाराला एखाद्या गंभीर आजार झाल्यास त्याच्या उपचाराकरिता १ लाख रुपये आर्थिक साहाय्य.

४ ) आर्थिक सहाय्य योजना :

 • नोंदणी केल्यानंतर ५००० रु आर्थिक साहाय्य.
 • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास वारसास ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य.
 • बांधकाम कामगारांना पेटी व सेफ्टी कीटचे वाटप.
 • बांधकाम कामगाराच्या मृत्यू नंतर अंत्यविधीसाठी १०००० रुपये आर्थिक सहाय्य.
 • बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पतीस अथवा विधुर पतीस आर्थिक साहाय्य.
 • बांधकाम कामगारांना सायकल वाटप.
 • बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी वाटप.
 • आत्महत्या ग्रस्त कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य.
 • बांधकाम कामगारांना सिलाई मशीन साठी आर्थिक साहाय्य.
 • बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार योजनेचा लाभ.