मुलींच्या लग्नासाठी आता मिळणार ५१००० रु. अनुदान.

मुलीच्या लग्नासाठी आता मिळणार ५१ हजार रु. अनुदान.

नमस्कार मित्रांनो.

नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्वाची अशी योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कल्याणकारी महामंडळाद्वारे मुलींच्या लग्नासाठी राबविण्यात येणारी योजना.

हि योजना मुख्यत्वे बांधकाम कामगारांच्या विकासासाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये मुलींच्या लग्नासाठी ५१००० रु. अनुदान नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहेत. यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे.

योजनेची उद्दिष्टे.

आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे हीच तिच्या आई वडिलांची इच्छा असते. आणि लग्न कितीही साध्या पद्धतीने केले तरीही लग्नाला चांगलाच खर्च येतो. हा खर्च कामगारांना न झेपावणारा असतो. शेवटी मुलीच्या आई वडिलांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि म्हणूनच शासनाकडून बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य केलं जात.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर या योजनेचा अर्ज करावा लागतो. त्यासाठी लागणारी कागदपत्रे अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

 • मुलीच्या लग्नाचे प्रमाणपत्र
 • मुलीचे रेशन कार्ड
 • मुलीचे आधार कार्ड
 • मुलीच्या जन्माचा दाखला किवा शाळा सोडल्याचा दाखला

या योजने साठी अर्ज कसा करावा.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल असाल तर तुम्हाला या योजनेचा online अर्ज करावा लागणार आहे.

यासाठी आपल्याकडे आपला नोंदणी क्रमांक ( REGISTRATION NUMBER ) असणे फार महत्वाचे आहे. आपण जेव्हा बांधकाम नोंदणी करत असतो तेव्हा हा नोंदणी क्रमांक आपल्याला मिळत असतो.

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे अर्ज करा

लिंक वर क्लिक केल्यानंतर बांधकाम कामगार महामंडळाची अधिकृत वेबसाईट ओपेन होईल.वेबसाईट ओपेन झाल्यावरच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत.

 • बांधकाम कामगार दाव्यासाठी online अर्ज करा.
 • त्यानंतर निव क्लेम ( NEW CLAIM )
 • त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक टाकून प्रोसिड टू फाँर्म या बटनावर क्लिक करा.
 • मोबाईल वर आलेला OTP दिलेल्या बाँक्स मध्ये टाका व VALIDATE करा.
 • OTP VALIDATE झाल्यानंतर एक नवीन फॉर्म ओपेन होईल.
 • त्या फॉर्म मध्ये आवशयक ती माहिती भरा.
 • व फॉर्म सबमिट करा.

बांधकाम कामगार महामंडळाच्या इतर कल्याणकारी योजनांविषयी जाणून घ्या.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाद्वारे कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्या योजना खालील प्रमाणे आहेत.

सामाजिक सुरक्षा योजना.

 • पहिल्या विवाहाच्या प्रतीपुर्तीसाठी ३०,००० रुपये अनुदान.
 • मध्यान्ह भोजन योजना.
 • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.
 • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
 • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
 • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना.

शैक्षणिक योजना.

 या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

 • इयत्ता १ ते ७ च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष २५०० रु.
 • इयत्ता ८ ते १० च्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५००० रु

अट : ( किमान ७५% किवा अधिक उपस्थिती आवश्यक )

 • ११ वी १२ वी पर्यंत प्रतीवर्षी १०,०००/- रुपये दिले जातील.
 • पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-रुपये दिले जातील.
 • अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-
 • वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००
 • MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.

आरोग्यविषयक योजना.

 • बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -६,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -१०,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य
 • नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला – ५,००,०००/- अर्थसाहाय्य
 • घर बांधणी साठी-४,५०,०००/- अर्थसहाय्य (केंद्र शासन- २,००००० /- कल्याणकारी मंडळ- २,५०,०००/-) अर्थसाहाय्य
 • कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव. 

बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार ?

बांधकाम कामगार योजना 2022 चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ते कामगार खालील प्रमाणे असतील.

 • फब्रिकेटस
 • फर्णिचर, सुतार कामगार
 • गवंडी कामगार
 • फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
 • पेंटींग कामगार
 • सेंट्रींग कामगार
 • वेल्डिंग
 • खुदाई कामगार

बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती

 • नोंदणी अर्ज
 • पासपोर्ट आकारातील २ फोटो
 • रेशन कार्ड झेरॉक्स
 • आधार किंवा मतदान कार्ड
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
 • नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )
 • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र