Bandhkam Kaamgar Scolarship | २५०० ते १००,००० शिष्यवृत्ती मिळणार.

Bandhkam Kaamgar Scolarship | नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या परिवारातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना आपल्या शिक्षणासाठी अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण बांधकाम कामगारांना कमी मजुरी मध्ये जास्त काम करावे लागते. व कधी कधी कामे सुद्धा भेटत नाहीत.

बांधकाम कामगारांना परिवाराचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व कामावर असताना होत असलेल्या अपघातांची भीती यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. म्हणूनच राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना महाजे बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी राबविण्यात येणारी शिष्वृत्ती योजना. या योजने अंतर्गत बांधकाम कामगारांंच्या मुलांना २५०० ते १००,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत असते.

Lakhpati Didi Yojana: ५ लाखांपर्यात मिळणार बिनव्याजी कर्ज.

Bandhkam Kaamgar Scolarship | योजनेंअंंतर्गत शिक्षणानुसार राबविण्यात येणाऱ्या विविध योजना.

 • इयत्ता पहिली ते सातवी दरम्यान शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
 • इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत प्रती वर्ष ५००० रुपये शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात येणार आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असतील त्या विद्यार्थ्यांना १० वी ते १२ वी दरम्यान प्रत्येक वर्षी १०,००० रुपये मिळणार आहेत.
 • १२ वी नंतर बांधकाम कामगारांचा मुलगा/मुलगी जर Medical चे शिक्षण घेत असेल अश्या विद्यार्थ्यांना प्रती वर्ष एक लाख रुपये लाभ देण्यात येत आहे.
 • Engineering/अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रती वर्ष ६०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
 • या योजनेचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम कामगारांच्या पत्नीलाही जर शिक्षण घ्यायचे असेल तर ते या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM Suryaghar Yojana 2024 |सोलर वर मिळणार ५० टक्के सबसिडी.

Bandhkam Kaamgar Scolarship | योजनेसाठी पात्रता :

 • अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.
 • अर्जदाराचे पाल्य हे शिक्षण घेत असायला हवेत.
 • अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी.
 • विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असायला हवी.
 • खासगी किंंवा कॉन्वेंट शाळेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरविला जाईल.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी मंडळाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे ठरवू दिले आहेत. त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपण या योजनांचा लाभ घेऊ शकतो.

 • बांधकाम कामगारांंच्या मुलांचे शाळेचे BONAFAED.
 • बांधकाम कामगारांंच्या मुलांचे आधार कार्ड.
 • शिक्षण घेत असलेल्या शाळेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र.
 • रेशन कार्ड.
 • स्वयं घोषणापत्र.

अर्ज भरत असताना Xerox सोबतच मूळ प्रमाणपत्रे सुद्धा सोबत ठेवावीत .

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

Bandhkam Kaamgar Scolarship | अर्ज कसा करावा :

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी ONLINE अर्ज करावा लागणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर बांधकाम विभागात आपली नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. नोंदणी बरोबरच आपले कार्ड हे अद्ययावत/UPDATE असणे सुद्धा अवश्य आहे.

कार्ड RENEW/UPDATE केलेले नसेल तर अगोदर RENEW/UPDATE करून घ्यावे व नंतरच अर्ज करावा. अर्ज सदर करताना आपल्याला पुढील STEPS चा वापर करावा .

 • सर्वप्रथम बांधकाम विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी .
 • होम पेज वरील CONSTRUCTION WORKER ONLINE APPLY या पर्यायावर क्लिक करा.
 • New Claim व Update Claim हे दोन पर्याय उघडले जातील त्यापैकी Update Claim या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • तुम्हाला देण्यात आलेला नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
 • पुढील फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रेUpload करायची आहेत.
 • त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
 • बांधकाम विभागामध्ये अर्जाची संपूर्ण पडताडनी केली जाईल व पात्र उमेदवाराच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती ची रक्कम transfer करण्यात येईल.

FAQ

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो ?

इमारत व इतर बांधकामे करणारे मजूर ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे ते या योजनेमध्ये नोंदणी करू शकतात.

बांधकाम कामगार कार्ड कसे काढावे ?

मागील वर्षभरात तुम्ही ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार/कंत्राटदार यांच्याकडून मिळवून घेऊन आपली नोंदणी करावी त्यानंतर हे कार्ड मिळते.

८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांना किती शिष्यवृत्ती मिळते ?

इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत प्रती वर्ष ५००० रुपये शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात येतो.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचे वैशिष्ट्य कोणते आहे ?

या योजनेचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम कामगारांच्या पत्नीलाही जर शिक्षण घ्यायचे असेल तर ते या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.