Biyane Anudaan Yojana 2024 |१०० टक्के अनुदानावर बियाणे मिळणार

Biyane Anudaan Yojana 2024 | नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बियाणे महामंडळा अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळणार आहे. खरीप हंंगामाकरिता या योजनेचे अर्ज mahadbt पोर्टल वर सुरु करण्यात आलेले आहेत.

बियाने अनुदान योजना हि खरीप व रब्बी या दोन्ही हंगामा करिता सुरु करण्यात येत असते. रब्बी हंगामा करिता साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्यांंध्ये तर खरीप हंगामा करिता जून ते जुलै महिन्या मध्ये बियाण्यांचे वाटप सुरु होत असते.

दोन्ही हंगाम सुरु होण्याच्या एक महिना आधीच बियाणे अनुदान योजनेकरिता mahadbt पोर्टल वर अर्ज सुरु करण्यात येत असतात.

Cibil Score सिबिल स्कोअर काय आहे?कसा वाढवायचा Cibil Score

Biyane Anudaan Yojana 2024 | कोणते शेतकरी पात्र :

बियाणे अनुदान योजने करिता पात्रता निकष पुढील प्रमाणे असणार आहेत .

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असला पाहिजेत.
 • अर्जदाराच्या स्वताच्या नावाचा ७/१२ असला पाहिजेत.
 • अर्जदाराच्या स्वताच्या नावाचा ८ अ असला पाहिजे.

Biyane Anudaan Yojana 2024 | योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :

 • आधार कार्ड. ( aadhar card )
 • पण कार्ड. ( pan card )
 • बँक पासबुक ( bank passbook )
 • ७/१२ ( land ownership document )
 • ८अ ( land ownership document )

Mahadbt पोर्टल वर Registration ( नोंदणी ) कसे करावे :

या योजने करिता अर्ज कसा करावा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. खालील स्टेप्स चा वापर करून तुही यशस्वी रित्या हा अर्ज करू शकता.

 • बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्या करिता सर्व प्रथम तुम्हाला Mahadbt च्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
 • जर तुमची पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची :

Biyane Anudaan Yojana 2024
Biyane Anudaan Yojana 2024
 • नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्या नंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे.
 • पुढे वापरकर्ता नाव व पासवर्ड बनवून घ्यायचे आहे.
 • त्याखालील चौकटीत तुमचा email id व मोबाईल नंबर टाकायचा आहे. ( मोबाईल नंबर तोच टाका जो तुमच्या आधार कार्ड सोबत संलग्न असेल. )
 • मोबाईल वर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करा व आलेला OTP दिलेल्या चौकटीत भरा.
 • पुढे दिलेला CAPTCHA भरून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Namo Shetkari Sanman Nidhi | पैसे मिळत नाहीत करा हे काम.

तुमची नोंदणी यशस्वी रित्या झालेली आहे.
 • आता तुम्हाला लॉग इन करू घ्यायचं आहे. त्याकरिता तुम्ही अगोदर निवडलेला USERNAME व ID PASSWORD टाकून घ्यायचा आहे.
 • पुढे तुम्हाला तुमच्या आधार चि नोंदणी करायची आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला आधार प्रमाणीकरणा साठी OTP किंवा BIOMETRIC चा वापर करायचा आहे.
 • OTP हा पर्याय निवडा व तुमच्या आधार कार्ड सोबत संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवा.
 • पुढे मी सहमत आहे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे व पुन्हा तुमचा मोबाईल वर एक OTP पाठवला जाईल तो OTP टाकून घ्यायचा आहे.
तुमची आधार नोंदणी यशस्वी रित्या झालेली आहे.

बियाणे या बाबीकरिता अर्ज कसा करावा :

 • तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून घ्ययचा आहे.
 • आता तुम्हाला तुमचे PROFILE पूर्ण करायचे व त्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, शेतजमिनीचा तपशील व पिकांचा तपशील व्यवस्थीत भरून घ्यायचा आहे.
 • PROFILE पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे, तुमच्या समोर काही बाबी दाखवल्या जातील. १) कृषी यांत्रिकीकरण. २) सिंचन साधने व सुविधा. ३) फलोत्पादन,४ ) बियाणे औषधे व खते, ५ ) छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना, ६ ) सौर कुंपण.
 • त्यापैकी बियाणे औषधे व खाते या बाबीवर क्लिक करायचे आहे.
 • पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा तालुका, गाव/ शहर व गट क्रमांक दाखवला जाईल. त्याच खाली तुम्हाला बाब निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. व बियाणे हि बाब निवडायची आहे. पुढील रकान्यात तुम्हाला तुमचे पिक निवडायचे आहे.
 • पुढील रकान्यात तुम्हाला हवे असलेले वान निवडायचे आहे. व तुमचे क्षेत्र टाकून अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
 • २३.६० रुपयांचे पेमेंट करून घ्या व मेन मेनू वर जाऊन अर्ज सदर करा.
 • तुम्ही भरलेला अर्ज तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायामध्ये जाऊन पाहू शकता.

बियाण्या नुसार जिल्हानिहाय यादी :

१ ) कापूस यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती.
२ ) बाजरी धुळे, जालना, धाराशिव, बीड, सांगली, संभाजीनगर, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, पुणे
३ ) ज्वारी नगर, धुळे, जालना, बीड, हिंगोली, जळगाव, नाशिक, सोलापूर, वाशीम, बुलढाणा, परभणी, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर.
४ ) उस संभाजीनगर, बीड, जालना.
जिल्हानिहाय यादी