Cibil Score सिबिल स्कोअर काय आहे?कसा वाढवायचा Cibil Score

आर्थिक विश्वात तुमचा cibil score सिबिल स्कोअर तुमच्या साठी होकायंत्रा प्रमाणे काम करत असत. तुमच्यासाठी अनुकूल किवा प्रतिकूल परिस्थिती मध्ये cibil score तुम्हाला चांगली आर्थिक दिशा दाखवण्याचे काम करत असतो. हि संख्या दर्शवते कि एखादी व्यक्ती कर्ज घेण्यास आणि पैसे परत करण्यास किती पात्र आहे.

cibil score हा साधारतः ३०० ते ९०० दरम्यान ठरवला जातो. हा स्कोअर तुम्हाला तुमची कर्ज फेडण्याची क्षमता पाहून दिलेल्या गुणांप्रमाणे आहे. बँका आणि वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीला कर्ज देण्याच्या जोखमींचे मुल्यांकन करण्यासाठी क्रेडीट स्कोअर वापरतात.

एखाद्याचा cibil स्कोअर जेवढा जास्त तेवढी त्या व्यक्तीला बँकांकडून किवा वित्तीय संस्थानकडून कर्ज मिळण्याची श्याक्यात जास्त असते.

Cibil Score सिबिल स्कोअर कसा ठरतो :

एखाद्या व्यक्तीचा Cibil Score ठरवण्यासाठी पुढील काही बाबीचा विचार केला जातो.

  • एखादा व्यक्ती किती वेळा कर्जाच्या हफ्त्याची रक्कम वेळेवर भरतो. ( Loan Repayment )
  • घेतलेल्या कर्जाचा इतिहास. ( Loan History )
  • कर्जाचा प्रकार. ( Type of Loans )
  • कर्जासाठी केलेली चौकशी. ( Loan Enquiries )
  • चालू कर्जाची खाती. ( Active Loan Account )

Namo Shetkari Sanman Nidhi | पैसे मिळत नाहीत करा हे काम.

Cibil Score सिबिल स्कोअर चांगला ठेवण्याचे फायदे :

१) कर्ज मिळण्यास सुलभता.

चांगला cibil score असल्याने अनेकदा बँका, वित्तीय संस्था, पत पेठ्या तुम्हाला स्वताहून कर्ज देण्यास इच्छुक असतात. तुमचा cibil score हा ७५० च्या वर असणे हि चांगला सिबिल स्कोअर असल्याची खून आहे.

२ ) कमी व्याज दर.

जर तुमचा सिबिल स्कोअर चागला असेल तर तुम्हाला बँकांकडून कमी व्याज दरावर कर्ज मिळू शकते. कमी व्याज दरामुळे तुमच्या मासिक EMI वर आणि कर्जाच्या एकूण रकमेवर अनुकूल परिणाम होत असतो.

३ ) विमा प्रीमियम.

चागल्या cibil score हा विम्याच्या प्रीमियम वर सुद्धा चांगला परिणाम करू शकतो. विमा कंपन्या अनेकदा प्रीमियम ठरवण्यासाठी Credit score चा वापर करत असतात. चागला cibil score तुमच्या घरावरील, गाड्यांवरील, व इतर हफ्त्यांच्या रकमेवर सुद्धा कमी आणू शकतो.

Cibil स्कोअर कसा वाढवायचा :

१ ) वेळेवर बिल भरणे.

तुमचा cibil score ठरण्यासाठी तुमच्या पेमेंट चा इतिहास ( Loan Repayment History ) हा एक महत्वाचा घटक असतो. तुअच्या क्रेडीट कार्ड चि बिले, तुमचे EMI, व इतर हफ्ते वेळेवर भरा. जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या CREDIT SCORE वर होणार नाही.

२ ) तुमचे CREDIT UTILIZATION RATIO कमी ठेवा.

CREDIT UTILIZATION RATIO म्हणजे कार्दाराच्या एकूण उपलब्ध क्रेडीटची टक्केवारी जि सध्या वापरली जात आहे. CREDIT UTILIZATION RATIO हा कर्जदाराच्या cibil score चि गणना करण्यासाठी क्रेडीट रिपोर्टिंग एजन्सी द्वारे वापरला जाणारा घटक आहे.

३ ) तुमच्या कर्ज खात्यांमध्ये विविधता आणा.

तुमच्या कर्ज खात्यांमध्ये जेवढी विविधता दिसेल तेवढे तुमच्या सिबिल स्कोअर साठी चांगले आहे. म्हणजेच तुम्ही घेतलेले कर्ज हे जर गृह कर्ज, गहान कर्ज, हफ्त्यांवरील कर्ज, क्रेडीट कार्ड असे असेल तर ते तुअच्या cibil score साठी चांगले आहे.

सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा तपासायचा ?

जर तुम्हाला तुमचे cibil score फ्री मध्ये तपासायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर Play Store वरून Paisa Baazar हे APP डाउनलोड करून घ्यायचे आहे. स्वतः चा मोबाईल क्रमांक टाकून SIGN करून घ्या तुम्हाला तुमचा CIBIL SCORE दिसेल.

आणखी वाचा :

Bandhkaam Kaamgar Nondani करा आणि मिळवा ३२ योजनांचा लाभ