Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

Inter Caste Marriage | नमस्कार मित्रांनो, आंतरजातीय विवाह केल्यानंतर तुम्हाला कोणता लाभ मिळतो, त्यानुसार तुम्हाला अनुदान किती मिळते, अर्ज कुठे करावा, कागदपत्रे कोणती लागतील व त्यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत ते आपण आज पाहणार आहोत.

ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या जातीमध्ये विवाह केला जातो त्याला आंतरजातीय विवाह म्हणतात. आंतरजातीय विवाह केल्यानंतर तुम्हाला राज्य शासनातर्फे ५० हजार रुपये व डाँँ भीमराव आंबेडकर फाउंंडेशन तर्फे २.५० लक्ष रुपये दिले जातात. या २ योजनें साठी तुम्हाला वेगवेगळे अर्ज करावे लागणार आहेत. १) महाराष्ट्र अंतर जातीय विवाह योजना २) डाँँ भीमराव आंबेडकर फाउनडेशन.

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump

Inter Caste Marriage : उद्देश्य.

आपल्या देशात जाती वाद व भेदभाव मोठ्या प्रमाणावर आहे. शासन सुद्धा अश्या प्रकारच्या विविध योजना राबवून जातीय सलोखा निर्माण व्हावा व जाती वाद नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करत असते. अश्या प्रकारच्या योजना राबवून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळणार आहे व समाजातील जाती-आधारित भेदभाव आणि हिंसाचार कमी होण्यास मदत होणार आहे.

लेक लाडकी योजना करणार मुलींना लखपती.

आंतरजातीय विवाह पात्रता :

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
 • योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मुलाचे व मुलीचे वय क्रमशः २१ व १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
 • मुलगा किवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जाती किवा जमातीचा असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराला कोर्ट मँँरेज करणे आवश्यक आहे.

Inter Caste Marriage : कागदपत्रे.

 • आधार कार्ड. ( adhar card )
 • बँक पासबुक. ( bank passbook )
 • जात प्रमाणपत्र. ( caste certificate )
 • वयाचे प्रमाणपत्र. ( age proof )
 • कोर्ट मेरेज केल्याचे प्रमाणपत्र. ( court marriage certificate )
 • मोबाईल क्रमांक. ( mobile number )
 • पासपोर्ट आकाराचे फोटो. ( passport size photos )

आंतरजातीय विवाहा साठी Online अर्ज कुठे करावा :

 • सर्वप्रथम सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी,
 • नंतर आंतरजातीय विवाहाच्या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • तुमच्या समोर एक फॉर्म उघडला जाईल त्या फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, जात, वय, लग्नाचा दिनांक, बँक खाते तपशील, इत्यादी माहिती भरा.
 • आवश्यक कागदपत्रे जसे कि जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाण पत्र, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, इत्यादी upload करा.
 • आपला फॉर्म सबमिट करा व त्याची प्रत काढून घ्या जेणेकरून ती प्रत तुम्हाला भविष्यात कामा पडेल.
 • सामाजिक न्याय विभागाची अधिकृत website खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

आंतरजातीय विवाहा साठी Offline अर्ज कुठे करावा :

 • सर्वप्रथम आंतरजातीय विवाहासाठी लागणारा अर्ज website वरून download करून घ्या किवा जिल्हा समाज कल्याण कार्यालातून मिळवा.
 • फॉर्म वर आपले नाव, वय, जन्म दिनांक, विवाह दिनांक, पत्ता, बँक account इत्यादी तपशील व्यवस्थित भरून घ्या.
 • आवश्यक कागदपत्रे जसे कि आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, पास पोर्ट आकाराचे फोटो व घोषणापत्र self attested करून फॉर्म ला जोडून घ्या.
 • विवाहाच्या १ वर्ष्याच्या आत कागदपत्रांसह फॉर्म जिल्हा समाज कल्याण अधिकार्याकडे जमा करा.
 • आंतरजातीय विवाहासाठी अर्जाची PDF खाली दिलेली आहे.