शेतकऱ्यांना पेमेंट चा पर्याय आला | kusum solar yojana

kusum solar yojana
kusum solar yojana

ही पंतप्रधान मोदींची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली होती. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत 34,2000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. शेतकऱ्यांसाठी सौरपंप बसवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजने अंतर्गत ९० ते ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना solar पंपाचे वाटप केले जाते. ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून online अर्ज केलेला आहे त्यांना जिल्हा निहाय कोटा उपलब्ध करून झाल्यावर solar पंप दिले जातात.

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump

kusum solar yojana | पेमेंट चा पर्याय कोणाला आला.

ज्या शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेले असतील व ज्यांच्या तृटीची पूर्तता झाली असेल अश्या शेतकऱ्यांना महौर्जा कडून self survey आणि payment चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

self survey आणि payment करण्याची पद्धती :

  • अर्जदारांनी महा उर्जा चे मोबाईल अँपलीकेशन डाऊनलोड करावे.
  • MK ID टाकून लॉग इन करून घावे.
  • त्यानंतर SELF SURVEY करून घ्यावा.
  • पेमेंट चा पर्यायावर जाऊन पेमेंट पूर्ण करून घ्यावे.

महत्वाची सूचना : तुम्हाला आलेला मेसेज हा खरा असल्याची खात्री करून घेऊनच पेमेंट करावे. तत्पूर्वी आपल्या नजीकच्या महाउर्जाच्या कार्यालयाला भेट देऊन १०० टक्के खात्री करून घ्यावी. kusum solar yojana च्या बनावट वेबसाईट वरून तुमची फसवणूक होऊ शकते. www.mahaurja.com हि एकमात्र वेबसाईट असून इतरत्र कोणत्याही वेबसाईट वर जाऊ नये.

kusum Solar Pump Yojana 2024 : प्रमुख मुद्दे

योजनेचे नावकुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र
योजनेचा उद्देशअनुदानावर सौर पॅनेल उपलब्ध करून देणे
लाभार्थीशेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
वर्ष2024

हे सुद्धा वाचा : बाल संगोपन योजना २०२४ | Bal Sangopan Yojana 2024

हे सुद्धा वाचा : लेक लाडकी योजना करणार मुलींना लखपती.