Maagel Tyala Shettale | शेततळ्यासाठी मिळणार ७५०००/- रुपये अनुदान

Maagel Tyala Shettale | कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी व शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी नवीन एक साधन उपलब्ध व्हावे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे हि योजना सुरु केलेली आहे.

या योजनेमध्ये पूर्वीपेक्षा लक्षणीय बदल व सुधारणा झालेली आहे. आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ७५,०००/- रुपये अनुदान दिले जाते. पूर्वी हेच अनुदान ५०,००० /- रुपये होते.

Namo Shetkari Sanman Nidhi | पैसे मिळत नाहीत करा हे काम.

Maagel Tyala Shettale | योजनेचे फायदे व परीणाम :

मागेल त्याला शेततळे हि योजना संपूर्ण राज्यात लागू असल्यामुळे, या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तून घडून येऊ शकते. त्यांच्यासाठी जलस्त्रोताचा एक पर्याय तर उघडला जाईलच त्याच बरोबर शेतकरी शेततळ्यामध्ये मच्छीपालन, शैवाल शेती यांसारखे उद्योग व्यवसाय देखील करू शकतात व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत देखील सुधारणा होऊ शकते.

शेततळे बांधल्याने केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांचाच फायदा होत नाही तर शेजारील शेतकऱ्यांचा देखिल जलसंधारण व पुनर्भरणा मुळे फायदा होऊ शकतो. शेततळे बांधल्याने भूजल पुनर्भरण झाल्यामुळे भूजल साठा पुन्हा भरून येऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होते.

Bandhkaam Kaamgar Nondani करा आणि मिळवा ३२ योजनांचा लाभ

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी पात्रता निकष :

मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील पात्रता व निकष पूर्ण करावे लागणार आहेत.

 • रहिवासी आवश्यकता : अर्जदार हा आहाराष्ट्र राज्याचा कायमचा रहीवासी असणे आवश्यक आहे.
 • शेतजमिनीची आवश्यकता : शेतकर्यांकडे किमान ६० आर म्हणजेच १ एकर शेतीची आवश्यकता असणार आहे.
 • नोंदणी : शेतकऱ्यांनी mahadbt या पोर्टल वर अर्ज करणे आवश्यक आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

या योजनेंतर्गत पात्र होण्यासाठी तुम्हाला खालील काही कागद्पत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

 • आधार कार्ड : ओळखीचा पुरावा.
 • बँक पासबुक : डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी.
 • ७/१२ : जमिनीची मालकी कागदपत्रे
 • ८ अ : जमिनीची मालकी कागदपत्रे

Maagel Tyala Shettale | योजनेसाठी अर्ज कसा करावा :

 • सर्वप्रथम तुम्हाला mahadbt च्या अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे.
 • जर तुमची आगोदरच नोंदणी झाली असेल तर username व password टाकून लॉग ईन करायचे आहे.
 • जर तुमची पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
Maagel Tyala Shettale , mahadbt farmer log in नवीन अर्जदार नोंदणी
 • नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्या नंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे.
 • पुढे वापरकर्ता नाव व पासवर्ड बनवून घ्यायचे आहे.
 • त्याखालील चौकटीत तुमचा email id व मोबाईल नंबर टाकायचा आहे. ( मोबाईल नंबर तोच टाका जो तुमच्या आधार कार्ड सोबत संलग्न असेल. )
 • मोबाईल वर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करा व आलेला OTP दिलेल्या चौकटीत भरा.
 • पुढे दिलेला CAPTCHA भरून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तुमची नोंदणी यशस्वी रित्या झालेली आहे.
 • आता तुम्हाला लॉग इन करू घ्यायचं आहे. त्याकरिता तुम्ही अगोदर निवडलेला USERNAME व ID PASSWORD टाकून घ्यायचा आहे.
 • पुढे तुम्हाला तुमच्या आधार चि नोंदणी करायची आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला आधार प्रमाणीकरणा साठी OTP किवा BIOMETRIC चा वापर करायचा आहे.
 • OTP हा पर्याय निवडा व तुमच्या आधार कार्ड सोबत संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवा.
 • पुढे मी सहमत आहे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे व पुन्हा तुमचा मोबाईल वर एक OTP पाठवला जाईल तो OTP टाकून घ्यायचा आहे.

Bandhkam Kaamgar Scolarship | २५०० ते १००,००० शिष्यवृत्ती मिळणार.

तुमची आधार नोंदणी यशस्वी रित्या झालेली आहे.
 • तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून घ्ययचा आहे.
 • आता तुम्हाला तुमचे PROFILE पूर्ण करायचे व त्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, शेतजमिनीचा तपशील व पिकांचा तपशील व्यवस्थीत भरून घ्यायचा आहे.
 • PROFILE पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे, तुमच्या समोर तीन बाबी दाखवल्या जातील. १) कृषी यांत्रिकीकरण. २) सिंचन साधने व सुविधा. ३) फलोत्पादन.
 • या तीन बाबींपैकी आपल्याला सिंचन साधने व सुविधा या बाबीवर क्लिक करायाचे आहे. पुढे तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे. व मुख्य घटकामध्ये सिचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे व उप घटकामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेततळे हि बाब निवडायची आहे.
 • बाब जतन करा आस पर्याय तुमच्या समोर दिसेल त्यावर क्लिक करा व मुख्य पृष्ठावर जाऊन अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
 • २३ रुपये ६० पैसे चे पेमेंट करा व तुमच्या अर्जाची एक प्रत काढून घ्या.
तुमचा शेततळे या बाबी साठी यशस्वी रित्या अर्ज सदर झालेला आहे.

एकदा तुमची नोंदणी झाली कि तुम्हाला पुढच्या वेळेस कोणताही अर्ज करताना तुम्हाला फक्त तुमच्या username व password ने लॉग इन करायचं आहे.

आणखी वाचा :

लेक लाडकी योजना करणार मुलींना लखपती.

PM विश्वकर्मा योजना. ०५ टक्के व्याजदराने मिळणार २ लाख रुपये कर्ज.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. मिळणार ६०००० रु.