Namo Shetkari Sanman Nidhi | पैसे मिळत नाहीत करा हे काम.

Namo Shetkari Sanman Nidhi

Namo Shetkari Sanman Nidhi | महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या या महत्वपूर्ण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये पेंशन दिली जाते. अश्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होऊन त्यांच्या उन्नतीस हातभार लागू शकतो. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अश्या प्रकारच्या योजना राबवणे गरजेचे आहे.

PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू केलेली आहे. PM किसान योजनेचे ६००० रुपये व नमो शेतकरी सन्मान निधी चे ६००० रुपये असे दोन्ही मिळून वार्षिक १२००० रुपये केंद्र व राज्य शासना कडून दिले जातात.

जे शेतकरी PM किसान योजेने अंतर्गत पेंशन साठी पात्र आहे त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी चा लाभ दिला जातो. परंतु काही शेतकरी PM किसान योजनेचे लाभधारक असून देखील त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी चा लाभ मिळत नाही. या लेखामध्ये आपण अश्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायांविषयी माहिती पाहणार आहोत.

Bandhkaam Kaamgar Nondani करा आणि मिळवा ३२ योजनांचा लाभ

Namo Shetkari Sanman Nidhi चा लाभ का मिळत नाही बघा मोबाईल वर.

या योजनेचे पैसे का मिळत नाहीत हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर Google Chrome मध्ये PM Kisan असा संकेतशब्द टाईप करायचा आहे. तुमच्या समोर PM Kisan ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. व पुढे तुम्हाला ३ पर्याय दिसतील.

Namo Shetkari Sanman Nidhi. know your status.
 • New Farmer Registration
 • E-Kyc
 • Know Your Status

या तीन पर्यायांपैकी तुम्हाला Know Your Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व पुढे तुमचा Registration Number व CAPTCHA भरून घ्यायचा आहे.

PM किसान Registration Number कसा पाहायचा ? Namo Shetkari Sanman Nidhi

जर तुमच्या कडे तुमचा Registration Number नसेल तर तुम्हाला पुढील स्टेप्स चा वापर करायचा आहे.

Namo Shetkari Sanman Nidhi. know your registration number.
 • सर्वप्रथम तुम्हाला Know Your Registration या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
 • त्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर व आधार नंबर या दोन पर्यायांपैकी मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • तुमचा Registered मोबाईल नंबर टाका व पुढील CAPTCHA फिल करा.
 • तुमच्या समोर OTP मिळवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमच्या मोबाईल वर आलेला OTP टाका.
 • पुढे तुम्हाला तुमचा Registration Number मिळेल. तो क्रमांक COPY करून घ्या किवा लिहून ठेवा पुढे कामात येईल.

Bandhkam Kaamgar Scolarship | २५०० ते १००,००० शिष्यवृत्ती मिळणार.

Registration Number वापरून PM किसान चे स्टेटस कसे पहायचे.

 • Know Your Status या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला मिळालेला Registration Number टाकून घ्या.
 • दिलेला CAPTCHA भरा व Get OTP या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्या मोबाईल वर आलेला otp भरा व Get Details या पर्यायावर क्लिक करा.
 • पुढे FTO Procced किवा FTO Not Procced यापैकी एक दिसेल.
 • FTO Procced असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही.
 • FTO Not Procced असेल तर तुमच्या प्रकरणा मध्ये काहीतरी अडचण आहे.
 • पुढे तुम्हाला त्याचे कारण दाखवले जाईल.

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

FTO Not Procced ची पुढील काही कारणे आहेत.

 • The Beneficiary’s KYC is not complete. ( लाभार्थ्याची KYC पूर्ण नाही )
 • The Beneficiary’s Application form has an incorrect IFSC Code. ( लाभार्थीच्या अर्जामध्ये चुकीचा IFSC Code आहे )
 • The Beneficiary’s name is Duplicate. ( लाभार्थ्याचे नाव चुकीचे आहे )
 • The Beneficiary’s Bank account is not linked with Their aadhar card. ( लाभार्थ्याचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत संलग्न नाही )
 • The Beneficiary is in an exclution catagory. ( लाभार्थी अपवर्जन श्रेणीमध्ये आहे )
 • The Beneficiary’s Bank account is Closed, Invalid, Transferred, Blocked, or Frozen. ( लाभार्थ्याचे बँक खाते बंद, अवैध, हस्तांतरित, अवरोधित किंवा गोठवलेले आहे. )
 • The Beneficiary’s Bank or Post Office name is invalid. ( लाभार्थीची बँक किंवा पोस्ट ऑफिसचे नाव अवैध आहे )

Namo Shetkari Sanman Nidhi किवा PM किसान चे पैसे न मिळण्याचे वरील काही कारणे आहेत. तुम्हाला जे कारण दाखवले जाईल त्या सुधारणा करून घ्या व Namo Shetkari Sanman Nidhi किवा PM किसान योजनेचा लाभ मिळवा.

PM किसान सन्मान निधी ची अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे :

आणखी वाचा :

बाल संगोपन योजना २०२४ | Bal Sangopan Yojana 2024

मागेल त्याला सोलर पंप योजना २०२४ | Magel Tyala Solar Pump