Sanjay Gandhi Niradhar Yojana | झाला मोठा बदल, लवकर करा हे काम.

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana हि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश्य निराधार,अनाथ, विधवा, अपंग व्यक्तींंसह समाजातील काही अति संवेदनशील घटकांना आर्थिक साहाय्य प्रदान करणे हा आहे.

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १५०० रुपये मासीक आर्थिक साहाय्य पुरविले जाते. या सहाय्यामुळे अश्या व्यक्तींना त्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यास हातभार लागत असतो.

या योजनेमध्ये शासनाने पत्रक काढून एक महत्वपूर्ण बदल केला आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना जे काही अनुदान दिल जात होतं ते अगोदर लाभार्थ्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा होत होतं, परंतु हे अनुदान आता लाभार्थ्यांना DBT म्हणजेच Direct Benefit Transfer द्वारे दिलं जाणार आहे.

Cibil Score सिबिल स्कोअर काय आहे?कसा वाढवायचा Cibil Score

Sanjay Gandhi Niradhar Yojana | लाभार्थ्यांना कोणते काम करावे लागणार ?

महाराष्ट्र शासनान एक पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवली आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थ्यांच्या आधार कार्ड सोबत संलग्नी करण करण्याची कार्यवाही १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टल द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित जमा करून घ्यायची आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.

 • आधार कार्ड.
 • मोबाईल क्रमांक.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • हयातीचा दाखला.

ज्यांना कागदपत्रे मागितली आहेत त्यांनी हि कागदपत्रे तुमच्या नजीकच्या तहसील ऑफिस मध्ये जमा करायची आहेत. व ज्या ठिकाणी तुमची बँक असेल त्या बँकेत जाऊन तुमचे आधार खाते DBT ला म्हणजेच NPCI ला लिंक करून घ्या म्हणजे अनुदाची रक्कम त्या बँक खात्यात DBT ने जमा केली जाईल.

Namo Shetkari Sanman Nidhi | पैसे मिळत नाहीत करा हे काम.

DBT म्हणजे काय ? व पैश्याचे वितरण कसे होणार ?

DBT ( Direct Benefit Transfer ) म्हणजे तुमच्या आधार सोबत जी बँक संलग्न असेल त्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना आता बँकेत फेर्या मारण्याची गरज पडणार नाही कारण आधार संलग्न बँकेत पैसे आल्यामुळे लाभार्थी त्यांच्या अंगठ्याने पैसे काढू शकणार आहेत.

Maagel Tyala Shettale | शेततळ्यासाठी मिळणार ७५०००/- रुपये अनुदान

NPCI Status कसे तपासायचे तुमचे आधार कोणत्या बँकेला संलग्न आहे |

 • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गुगल वर जाऊन dbt bharat असे टाइप करायचे आहे.
 • पहिल्याच नंबर च्या वेबसाईट वर जाऊन होम पेज ला वरच्या साईड ला Citizens Bank Account Aadhar Linking Status असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे.
 • त्यानंतर तुम्हाला आधार च्या ऑफिसियल वेबसाईट वर redirect केलं जाईल.
 • ५ नंबर ला Bank Seeding Status असा पर्याय तुमच्यासमोर दिसेल त्यावर क्लिक करा.
 • पुढे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व दिलेला CAPTCHA भरून घेऊन Send OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार सोबत लिंक असेल त्यावर एक OTP जाईल तो OTP भरून घेऊन Log In या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • तुमच्या समोर परत काही पर्याय येतील त्यातील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे.
 • पुढच्या पेज वर तुम्हाला तुमच्या Aadhar चे संपूर्ण Status दाखवले जाईल.
 • ज्या Bank सोबत तुमचे आधार लिंक असेल त्या बँकेचे नाव दाखवले जाईल कोणत्या दिवशी Aadhar लिंक केले गेले ती दिनांक दाखवली जाईल.
आणखी वाचा :

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

Lakhpati Didi Yojana: ५ लाखांपर्यात मिळणार बिनव्याजी कर्ज.