Sarthi cumputer course | मराठा-कुणबी तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण.

Sarthi cumputer course | नमस्कार मित्रांनो, CSMS-DEEP म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ४०००० मराठा कुणबी युवकांना मोफत संंगनक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम व MKCL अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र राज्यातील नॉन क्रिमीलेयर गटातील तरुंनांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. मिळणार ६०००० रु.

Sarthi cumputer course : वैशिष्ट्ये

 • या प्रशिक्षणासाठी वयोगट मर्यादा १८ ते ४५ असून या वयोगटातील नॉन क्रीमिलेयर मराठा/कुणबी तरुणांना याचा फायदा होणार आहे.
 • सदर प्रशिक्षण हे मोफत असून या साठीचा खर्च Sarthi पुणे हि संस्था उचलणार आहे.
 • या प्रशिक्षणासाठी ४०००० जागा आहेत.
 • उमेदवार हा कमीतकमी १० वी पास असणे आवश्यक आहे.
 • सदर प्रशिक्षण हे ६ महिन्याचे असणार आहे.

Sarthi प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे

या कार्यक्रमांतर्गत प्रथम येणारयास प्राधान्य दिले जाणार आहे.

 • अर्जदार १० पास असल्याची कागदपत्रे. ( मार्कशीट )
 • आधार कार्ड.
 • जन्म प्रमाणपत्र.
 • नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र.
 • वयाचा पुरावा. ( आधार कार्ड, पँँण कार्ड, मतदान कार्ड )
 • जातीचे प्रमाणपत्र किवा EWS प्रमाणपत्र.
 • उत्पन्नाचा दाखला. ( ३ वर्षाचा )
 • DOMICILE CERTIFICATE. ( तहसीलदार यांचा रहिवासी दाखला )
 • अर्जदाराचा फोटो व सही

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.

अर्ज कुठे करायचा ?

 • सर्वप्रथम तुम्हाला https//sarthi.mkcl.org या संकेतस्थळावर जायचं आहे.
 • साईट वर गेल्यानंतर तुम्हाला New user Registration बटन दिसेल तिथे जाऊन Registration करून घ्यायचं आहे.
 • Registration पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला तुमचे नाव, वय, लिंग, आधार क्रमांक इत्यादी दिलेली माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
 • त्यानंतर तुम्हाला एक फोटो काढावा लागेल व तो फोटो उपलोड करावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबतचा एक व्हीडीओ सुद्ध्या काढायला सांगण्यात येईल तुमचे नाव व पत्ता त्या व्हीडीओ मध्ये रेकॉर्ड करून सबमिट करा.
 • तुम्हाला PRN नंबर दिला जाईल त्या PRN नंबर ने लॉग इन करून तुम्हाला पुढे ७ STEPS पूर्ण करायच्या आहेत. जसे की तुमच्या BASIC DETAILS, ADDRESS DETAILS, CASTE CATEGORY, WORK EXPERIENCE, DOCUMENT UPLOAD, व PROFILE SUMMARY या सर्व स्टेप्स पूर्ण करून तुम्हाला एक तालुका CENTRE दिले जाईल.
 • तुमचे APPLICATION सबमिट करून त्याची प्रत काढून घ्या.

आणखी वाचा : PM Suryaghar Yojana 2024 |सोलर वर मिळणार ५० टक्के सबसिडी.

Inter Caste Marriage | नवविवाहित जोडप्यांना ३ लाख रुपये मिळणार.